मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 मार्च 2017 (09:50 IST)

जवानाचा बर्फात गुदमरून मृत्यू

mahadev tupare
लेह-श्रीनगर मार्गावरील दराज येथे महिपाळगड (ता. चंदगड) येथील जवान महादेव तुपारे यांचा बर्फात गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 8 मार्च रोजी ही घटना घडली. यामुळे चंदगड तालुक्यात शोककळा पसरली आहे. महादेव तुपारे यांचा बर्फवृष्टीमुळे बर्फाखाली गुदमरुन मृत्यू झाल्याची बातमी सैन्यातील अधिकाऱ्यांनी तुपारे कुटुंबियांनी गुरुवारी कळवली. महादेव तुपारे हे 16 कुमाँऊ रेजिमेंटमध्ये उत्तराखंड येथे सैन्यात 2005 साली भरती झाले होते. सैन्यात ते क्लार्क या पदावर कार्यरत होते.