1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 25 मे 2022 (15:55 IST)

रेशनच्या नियमांमध्ये मोठे बदल; जूनपासून लागू होणार

Ration
सरकारने रेशनच्या नियमात मोठा बदल केला आहे. हा बदल जून महिन्यापासून लागू होणार आहे. अशा परिस्थितीत सर्व शिधापत्रिकाधारकांना या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. 
 
केंद्र सरकारकडून राज्यातील शिधापत्रिकाधारकांना मोफत गहू आणि तांदूळ वाटप केले जाते. हे वितरण पीएम गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केले जाते. आता या योजनेत गव्हाऐवजी तांदूळ दिला जाणार आहे. असे झाल्यास जूनपासून तुम्हाला गहू कमी आणि तांदूळ जास्त मिळेल.
 
मोदी सरकारने गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मे ते सप्टेंबर या कालावधीत वाटप करण्यात येणारा गव्हाचा कोटा कमी केला आहे. या बदलानंतर यूपी, बिहार आणि केरळमध्ये गहू मोफत वितरणासाठी उपलब्ध होणार नाही.
 
तसेच दिल्ली, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये गव्हाचा कोटा कमी करण्यात आला आहे. 
या राज्यांमध्ये कार्डधारकांना गहू कमी आणि तांदूळ जास्त मिळेल. उर्वरित राज्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.