प्रसिद्ध रुग्णालयात मोठी आग
कोलकाता मधील सॉल्ट लेकमधील आनंदलोक रुग्णालयात भीषण आग लागली. संपूर्ण परिसर दाट धुराने व्यापला व रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, त्यामुळे रुग्णालयात घबराट पसरली. आग दुसऱ्या मजल्यावर लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा रुग्णांचे नातेवाईक बाहेर आले, तेव्हा त्यांनी सांगितले की अग्निशमन दलाच्या जवानांना येण्यास उशीर झाला, त्यामुळे त्यांनी स्वतःच आग विझवण्याचा प्रयत्न केला. रुग्णांना बाहेर पडण्यासाठी काच फोडावी लागली. कर्मचाऱ्यांनी सांगितले की आग वेगाने पसरत होती. दुसऱ्या मजल्यावरील काचेचे काही भाग फोडावे लागले. काही लोक हातात सलाईनचे पाणी घेऊन बाहेर आले.
अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सॉल्ट लेकमधील करुणमयी क्रॉसिंग येथील एका खाजगी आरोग्य सुविधेच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. त्यांनी सांगितले की, सकाळी १० वाजता आगीची माहिती मिळाली आणि आग विझवण्यासाठी किमान तीन अग्निशमन गाड्या घटनास्थळी तातडीने पाठवण्यात आल्या. त्यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. आगीचे नेमके कारण सध्या अज्ञात आहे, परंतु प्रामुख्याने शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे.
Edited By- Dhanashri Naik
