1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Forest Department arrested 12 poachers in Gadchiroli

गडचिरोलीच्या वन विभागाची कारवाई; दुर्मिळ वन्यजीवांची शिकार करणाऱ्या १२ जणांना अटक

गडचिरोलीच्या अलापल्ली वनक्षेत्रात एका मोठ्या मोहिमेत वन विभागाने १२ शिकाऱ्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून शेखरूसह दुर्मिळ वन्यजीवांचे अवशेष जप्त करण्यात आले आहे.
अलापल्ली वन विभागाने वन्यजीवांची शिकार करण्यासाठी जंगलात दबा धरून बसलेल्या शिकाऱ्यांच्या टोळीला पकडण्यात मोठे यश मिळवले आहे. रविवारी संध्याकाळी राबवण्यात आलेल्या या मोहिमेत बारा शिकाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेखरू आणि इतर दुर्मिळ वन्यजीवांचे अवशेषही जप्त करण्यात आले. 
आरोपींकडून चार शेकरू, एक उडणारी खार, एक हॅरियर पक्षी आणि घुबड प्रजातीच्या अवशेषांसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
 
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
भाजप नेत्या नाझिया खान यांनी लेन्सकार्ट स्टोअरला भेट दिली, हिंदू कर्मचाऱ्यांना टिळा लावला; व्हिडिओ व्हायरल