रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 3 ऑक्टोबर 2021 (15:54 IST)

पोटनिवडणुकीत भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी नंदीग्राममधील पराभवाचे दुःख विसरल्या, ममता बॅनर्जी यांचा दणदणीत विजय

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपूरमध्ये जबरदस्त विजयासह नंदीग्राममधील पराभवाचे दुःख विसरल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी भवानीपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) उमेदवार प्रियांका तिब्रेवाल यांचा विक्रमी 58,832 मतांनी पराभव केला आहे. यासह, ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या खुर्चीवरील धोका दूर केला आहे. नंदीग्राममधील पराभवानंतर मुख्यमंत्री झालेल्या ममतांनी 5 नोव्हेंबरपूर्वी विधानसभेत पोहोचणे आवश्यक होते. ममतांनी यापूर्वी दोन वेळा ही जागा जिंकली आहे, परंतु मतांच्या फरकाने हा त्यांचा दणदणीत विजय आहे.
 
विजयानंतर माध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर आणि पश्चिम बंगालच्या लोकांचे आभार मानले. या दरम्यान नंदीग्रामच्या पराभवाचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या की, भवानीपूरच्या लोकांनी तेथे रचलेल्या षडयंत्राला चोख प्रत्युत्तर दिले. भाजपच्या उमेदवार प्रियंका तिब्रेवाल यांनी त्यांचा पराभव स्वीकारला आणि ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले.
 
बॅनर्जींनी मोठ्या प्रमाणावर आघाडी घेतल्याच्या वृत्तांनंतर टीएमसी समर्थक उत्सव साजरा करण्यासाठी रस्त्यावर उतरले. त्याचवेळी भाजप आणि माकपच्या राज्य कार्यालयांमध्ये शांतातेचे वातावरण होते. दरम्यान, निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना पत्र लिहून त्यांना मतदानानंतरच्या हिंसाचाराची कोणतीही घटना टाळण्यासाठी विजय उत्सव आणि मिरवणुका थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.
 
तिब्रेवाल यांनी शनिवारी रात्री कोलकाता उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल यांना पत्र लिहून निवडणूक निकालाच्या घोषणेनंतर हिंसाचाराची कोणतीही घटना रोखण्यासाठी पोलिसांना खबरदारीचे उपाय करण्याचे आदेश देण्याची विनंती केली. राज्यमंत्री सोवंदेब चट्टोपाध्याय यांनी भवानीपूरची जागा रिक्त केली होती कारण बॅनर्जी विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत झाल्या होत्या जेणेकरून बॅनर्जी या जागेवरून जिंकून विधानसभेत परतू शकतील. टीएमसीने एप्रिल-मे विधानसभा निवडणुकीत सुमारे 28,000 मतांच्या फरकाने जागा जिंकली होती.