बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 एप्रिल 2021 (14:51 IST)

ममता दीदी, दुसऱ्या जागेवरून अर्ज भरणार आहात का? - मोदी

पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं वाहतं आहे. तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट टक्कर असलेल्या पश्चिम बंगालमध्ये काल (1 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या नंदिग्राममधील विजयावर प्रश्न उपस्थित केले.
 
नरेंद्र मोदी म्हणाले, "ममता दीदी, बंगालमधील जनता तुमच्यावर नाराज आहे आणि जनतेच्या संतापापासून तुम्हाला आता कुणीही वाचवू शकत नाही. नीट ऐका, बंगालची जनता आता तुम्हाला शिक्षा देणार आहे."
 
"शेवटच्या टप्प्यातील अर्ज भरणं अद्याप बाकी आहे. हे खरंय का, की तुम्ही दुसऱ्या जागेवरून अर्ज भरणार आहात?" असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला.
 
नरेंद्र मोदी यांनी उलुबेरिया इथल्या सभेत भाजप कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केलं.