बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 1 एप्रिल 2021 (13:52 IST)

आधार-पॅन लिंकसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ

पॅन कार्ड आणि आधार कार्डला लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे.
 
आता 30 जून, 2021 पर्यंत पॅन कार्ड आधारला लिंक करता येणार आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड परस्परांशी लिंकिंगसाठी केंद्र सरकारने दिलेली मुदत बुधवारी (31 मार्च) संपत होती. मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल, तर आर्थिक व्यवहार अडचणीत येण्यासह मोठ्या दंडाला सामोरे जावे लागणार होते. दरम्यान, बुधवारी अचानक आयकर विभागाच्या  संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणावर लोक लिंक करण्यासाठी आले. परिणामी आयकर विभागाचा सर्व्हर डाऊन झाला. त्यामुळे ही प्रक्रिया रखडली. 31 मार्चपर्यंत जर पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसते, तर आजपासून 1000 रुपयांचा दंड होणार होता.
 
मात्र सर्व्हरच्या डाऊन झाल्याने अनेकांनी मुदत वाढवून देण्याची मागणी केली. त्यानंतर आता केंद्र सरकारने 30 जूनपर्यंत पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची मुदत वाढवून दिली आहे.