मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मियामी , गुरूवार, 1 एप्रिल 2021 (13:37 IST)

मियामी ओपन : बार्टी व मेदवेदेव्ह उपान्त्य फेरीत

Miami Open
क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडू अॅ्श्ले बार्टीने अखेरचे नऊ गुण प्राप्त करत मियामी ओपन टेनिस टुर्नामेंटच्या महिला एकेरी गटातील उपान्त्यफेरी  गाठली आहे. तर पुरूषांच्या गटातून अव्वल मानांकित डॅनियल मेदवेदेव्हने सरळ सेटमध्ये विजय नोंदवत अंतिम चारमध्ये आपली जागा पक्की केली आहे.
 
बार्टीने सातवया मानांकित आर्यना सबालेंकाचा 6-4, 6-7 (5), 6-3 ने पराभव केला. ही तिची मागील चार सामन्यातील तिसरी वेळ आहे, ज्यामध्ये तिने तीन सेटमध्ये विजय नोंदवला आहे. मेदवेदेव्हने फ्रान्सिस टिफोउला सहजच 6-4, 6-3 ने पराभूत केले.
 
अमेरिकेच्या सेबेस्टियन कोर्डाने पाचव्या मानांकित अर्जेंटिनाचा खेळाडू डिएगो श्वार्टझॅमनचा 6-3, 4-6,7-5 ने पराभव केला. एका अन्य सामन्यात रूसच्या आंद्रेई रूबलेव्हने मारिन सिलिचचा 6-4, 6-4 ने पराभव केला. महिलांच्या गटातून बार्टी उपान्त्य फेरीत पाचव्या मानांकित इलिना स्वितोलिनाला भिडेल. तिने अनास्तेसिया सेवास्तोव्हाचा 6-3, 6-2 ने पराभव केला. जॉन इसनरने एक मॅच पॉइंट गमावला व अखेरीस राबर्टो बातिस्ता आगुटने तला 6-3, 4-6, 7-6 (7) ने पराभूत केले. उपान्त्य फेरीत मेदवेदेव्ह व आगुट आमनेसामने असतील.