गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 17 मार्च 2021 (17:07 IST)

संदीपचा आशियाई ऑलिम्पिक क्वालिफायर्सच्या ट्रायल्समध्ये प्रवेश

नॅशनल फ्री स्टाइल चॅम्पियन भारतीय पैलवान संदीप सिंहने (74 किलो वजनी गट) मंगळवारी झालेल्या ट्रायल्समध्ये विजय मिळवत आगामी आशियाई ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेतील क्वॉलिफायर्सच्या ट्रायल्समध्ये प्रवेश करत कांस्यपदक विजेत्या नरसिंह यादवचे स्वप्न धुळीस मिळविले. 
 
संदीपने राष्ट्रीय निवड ट्रायल्सच्या उपान्त्य फेरीत नरसिंहचा पराभव केला. त्यानंतर त्याने अंतिम सामन्यात आशियाई पदक विजेता अमित धनखडला 2-1 ने पराभूत करत आशियाई ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेच्या क्वॉलिफायर्समध्ये आपले स्थान पक्के केले.