बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 8 मार्च 2021 (18:02 IST)

महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात विशेष महिला लसीकरण केंद्रे सुरू केली

आंतरराष्ट्रीय महिलादिना निमित्त सोमवारी महाराष्ट्र सरकारने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशी 5 कोरोना व्हायरस कोविड-19 लसीकरण केंद्रे सुरू केली, जिथे फक्त महिलांना लस देण्यात येईल. 
एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की ही केंद्रे केवळ एका दिवसासाठी चालविण्यात येतील आणि लस घेण्याच्या इच्छुक महिला या केंद्रावर   जाऊन लसीकरण घेऊ शकतात. अधिकाऱ्याने सांगितले की, आज प्रत्येक जिल्ह्यात अशी पाच केंद्रे सुरू केली गेली आहेत. ठाणे जिल्ह्यात अशा केंद्रांना जास्त मागणी लक्षात घेता 19 केंद्रे तयार केली गेली आहेत. राज्यात एकूण 189 महिला लसीकरण केंद्रे आहेत. 
 
महाराष्ट्रात , रविवारी कोरोनाव्हायरसचे 11,141 नवीन रुग्ण महाराष्ट्रात नोंदले गेले आणि संक्रमणाची एकूण प्रकरणे  22,19,727 वर पोहोचली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, कोविड -19 मुळे राज्यात आतापर्यंत 
 52,478 लोकांचा मृत्यू झाला आहे.