बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 6 मार्च 2021 (22:50 IST)

आमदार संजय गायकवाड यांच्या कुटुंबातील 12 जणांना कोरोना

राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या कुटुंबातील 12 जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आमदार गायकवाड यांची पत्नी, सून, 12 दिवसांची नात, दोन्ही पुतणे, गायकवाड यांच्या वहिनी, त्यांचे भाचे आणि परिवारातील आणखी काही सदस्य अशा 12 जणांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 
 
कुटुंबासोबतच आमदार गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयातील टाईप राइटर आणि चालक सुद्धा पॉझिटिव्ह आल्याने 11 मार्चपर्यंत त्यांचे कार्यालय सुद्धा बंद राहणार आहे. आमदार गायकवाड अधिवेशनासाठी मुंबईत असल्यामुळे ते स्वतः व त्यांच्यासोबतची टीम मात्र निगेटिव्ह आहे.