गुरूवार, 6 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 6 मार्च 2021 (23:17 IST)

कोरोना नियंत्रणासाठी केंद्राकडून पथकं येणार

Teams will come from the center to control the corona Squads will be sent from the center maharashtra news coronavirus news in marathi
राज्यात जवळपास पाच महिन्यानंतर २४ तासांच्या अवधीत १० हजारांपेक्षा करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्याच्या आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली असून, केंद्र सरकारही सावध झालं आहे.  महाराष्ट्र आणि पंजाबमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राकडून पथकं पाठवण्यात येणार आहेत. ही पथकं राज्य सरकारांसोबत करोना परिस्थितीवर नजर ठेवण्याबरोबरच संक्रमण नियंत्रण आणि साखळी तोडण्यासाठी राज्यांच्या आरोग्य विभागांना मदत करणार आहे.
 
राज्यात ५ मार्च रोजी २४ तासात १०,२१६ नव्या रुग्णांची नोंद झाली. करोनामुळे ५३ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही ९० हजारांच्या आसपास झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १८ हजार रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात नागपूरमध्ये सर्वाधिक १२२५ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर पुणे शहर ८४९, पिंपरी-चिंचवड ५४९, उर्वरित पुणे जिल्हा ३६९, नाशिक शहर ३५२, जळगाव जिल्हा ५४०, सातारा २१४, औरंगाबाद ३१८, अकोला १४८, अमरावती शहर ४३५, यवतमाळ २५१, वाशिम २०७ नवे रुग्ण आढळले.