बाप्परे, राज्यात ११ हजार १४१ नवे कोरोनाबाधित रुग्ण
राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा फोफावला असल्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. रविवारी ११ हजार १४१ नवे कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ३८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यात आतापर्यंत एकूण ५२ हजार ४७८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांचा आकडा ९७,९८३ हजाराच्या घरात पोहोचले आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या आकड्याने राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात रविवारी ६०१ ३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून घरी परतले आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९३.१७ टक्के एवढे झाले आहे. तसेच एकूण २०,६८,०४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १,६८,६७,२८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २२,१९,७२७ (१३.१६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,३९,०५५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,६५० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.