गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 मार्च 2021 (23:22 IST)

वाचा , राज्यात लॉकडाऊन होणार का?

राज्यातला वाढता कोरोना प्रादुर्भाव बघता लवकरच राज्य सरकार १० दिवसांसाठी लॉकडाऊन करणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. मात्र सरकारकडून याबाबत कुठलीच माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या तरी ही माहिती फक्त अफवा असल्याचे समजते. 
 
दुसरीकडे नागपुरमध्ये कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने  १४ मार्चपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे गर्दी होत असलेल्या भागांत लॉकडाऊनचे संकेत महापालिका आयुक्तांनी दिलेत. शहरातील जाधववाडी मंडी, गुलमंडी बाजार, कॅनॉट परिसर या भागांवर लक्ष केंद्रीत केल्याचं आयुक्त म्हणाले. पुढचे काही दिवस इथली रुग्णसंख्या वाढत राहिली तर हे भाग बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचं आयुक्तांनी सांगितलं. संपुर्ण शहरात लॉकडाऊन होणार नाही असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं.