1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 17 मार्च 2021 (17:21 IST)

बबिता फोगाट च्या बहिणीने आत्महत्या केली

क्रीडा जगत मधून ह्रदय विदारक बातमी येत आहे कुष्टीचा अंतिम सामना हरल्यानंतर भारतीय महिला कुस्तीपटू रितिका ने आत्महत्या केली आहे. रितिका ही बबिता फोगट हिची मामे बहीण होती. रितिकाने  सोमवारी रात्री आपल्या गावी बलाली मध्ये गळफास लावून आत्महत्या केली. 
मीडिया रिपोर्टनुसार, रितिका ने 12 ते 14 मार्च  दरम्यान राजस्थानच्या लोहगड स्टेडियम मध्ये झालेल्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर,ज्युनिअर महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धेत भाग घेतले होते. 
14 मार्च रोजी अंतिम सामना खेळण्यात आला, या मध्ये रितिका एक अंकाने पराभूत झाली. पराभूत झाल्यावर तिला या गोष्टीचा हादरा बसला आणि तिने राहत्या घरात स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली 
 
राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यात जैतापूर गावात राहणारी 17 वर्षाची रितिका आपल्या काका द्रोणाचार्य अवार्डी महावीर पहलवान यांच्या गावी बलाली येथील कुस्ती अकादमीत गेल्या 5 वर्ष पासून सराव करीत होती. 53 किग्रा वजन गटात राज्य पातळीवर एका अंकाने झालेल्या पराभवाने रितिकाला मोडून टाकले की तिने हारून हे पाऊल उचलले. या पूर्वी तिने सुमारे 4 वेळा राज्य स्तरीय स्पर्धेत भाग घेतला होता.