मिस युनिव्हर्स इंडिया 2025 चा किताब जिंकणारी मनिका विश्वकर्मा कोण आहे
Miss Universe India 2025 : भारताला 2025 ची नवी मिस युनिव्हर्स इंडिया मिळाली आहे.राजस्थानच्या मनिका विश्वकर्माने जयपूरमध्ये मिस युनिव्हर्स इंडिया 2025 चा किताब जिंकला आहे. मनिका मूळची राजस्थानच्या गंगानगरची आहे आणि दिल्लीमध्ये मॉडेलिंग करते.
हा किताब जिंकल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. मूळ राजस्थानची असलेल्या मनिका विश्वकर्मा हिच्या या कामगिरीचा केवळ राजस्थानच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे.मनिका राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रात पदवी घेत आहे. तिने अभ्यासासोबत मॉडेलिंगचाही समतोल साधला आहे. तिला शास्त्रीय नृत्य आणि कला यात रस आहे.
मनिका या वर्षाच्या अखेरीस थायलंडमध्ये होणाऱ्या 74 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल. या स्पर्धेत 130 देशांतील सुंदरी सहभागी होतील.
तिने तिच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे आणि तिच्या मार्गदर्शकांचे आभार मानले आहेत. तिने म्हटले आहे की आता माझे ध्येय भारताचे सर्वोत्तम पद्धतीने प्रतिनिधित्व करणे आणि मिस युनिव्हर्सचा मुकुट घरी आणणे आहे.
मनिकाच्या विजयाबद्दल, अभिनेत्री आणि ज्युरी सदस्य उर्वशी रौतेला यांनी तिला तिच्या भावी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. मनिकाने 2024 मध्ये मिस युनिव्हर्स राजस्थानचा किताबही जिंकला.