1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. manish sisodia

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कार्यालयात चोरी

manish sisodia
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कार्यालयात  चोरी झाली आहे. यावेळी  चोरट्यांनी कार्यालयातून दोन संगणकांच्या सीपीयूसह  लेटरहेड आणि अन्य काही कागदपत्रांची चोरी केली आहे. त्याबरोबरच पुरावा मागे राहू नये म्हणून सीसीटीव्हीचा संचही चोरट्यांनी चोरला आहे.  घटनास्थळी धाव घेत तपासकामास सुरुवात केली आहे. याबाबतची माहिती दिल्ली पूर्व विभागाचे पोलीस आयुक्त ओमवीर सिंग यांनी दिली आहे.  
 
पुढील लेख
सेरेनाचे 'रेडिट'चा को-फाउंडर एलेक्सिस ओहेनियन सोबत लग्न