शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 26 मार्च 2019 (16:41 IST)

गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अस्थींचे रामकुंडात विधिवत विसर्जन

नाशिक-गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय सरंक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अस्थींचे भाजपाचे प्रदेश कार्यालयीन चिटणीस मुकुंद कुलकर्णी यांच्या हस्ते रामकुंडात विधिवत विसर्जन करण्यात आले.
 
       मनोहर पर्रिकर यांचे नुकतेच निधन झाले.त्यांच्या अस्थींचे नाशकात विसर्जन करण्यात येणार असे जाहीर झाल्यानंतर त्यांचा अस्थीकलश घेऊन मुकुंद कुलकर्णी नाशकात आले. विधिवत पूजा झाल्यानंतर त्यांच्याच हस्ते रामकुंडात पर्रिकर यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. पौरोहित्य सतीश शुक्ल, चंद्रशेखर पंचाक्षरी आणि प्रतिक शुक्ल यांनी केले.
 
      यावेळी प्रदेश उपाध्यक्ष वसतगिते,भाजपा महानगर अध्यक्ष आ.बाळासाहेब सानप,आ.देवयानी फरांदे,आ.सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, उत्तमराव उगले,नंदू देसाई, देवदत्त जोशी,नगरसेविका स्वाती भामरे, सुनील देसाई, माणिकराव देशमुख, पप्पू माने, धनंजय पुजारी,अनिल भालेराव,राजेंद्र मोरे,महेश सदावर्ते,अमित घुगे,स्मिता मुठे,प्रदीप पाटील, सतीश वावीकर,दिगंबर धुमाळ,सोमनाथ बोडके, ऋषिकेश आहेर, अनिल वाघ,रामभाऊ जानोरकर,अविनाश पाटील,प्रशांत मुळे, मधुकर दीक्षित,  विजय बनछोड,तुषार कुलकर्णी, पंकज भुजंग आदी उपस्थित होते.
फोटो कॅपशन-  मनोहर पर्रीकर यांच्या अस्थि रामकुंडात विसर्जित करताना मुकुंद कुलकर्णी, बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, रंजना भानसी, सतीश शुक्ल, चंद्रशेखर पंचाक्षरी, अमित घुगे आदी.