शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

गोव्यात भाजप गठबंधन सरकार, प्रमोद सावंत यांनी केलं बहुमत सिद्ध

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्याचे नवीन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज विधानसभे बहुमत सिद्ध केले. 20 मतांनी प्रमोद सावंत यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. यात भाजपचे 11 आमदार, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे 3, गोवा फॉरवर्ड चे 3 आणि अपक्ष 3 यांनी मतदान केले.
 
गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत यांचा सोमवारी मध्यरात्री शपथविधी झाला. यानंतर भाजपला विधानसभेत शक्तिपरीक्षेला सामोरे जावे लागले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बहुमताचा दावा केल्यानंतर राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी बुधवारी विधानसभेचे विशेष सत्र बोलावले होते. गोव्यात भाजपाचे संख्याबळ १२ असून, गोवा फॉरवर्ड पक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाच्या प्रत्येकी तीन आमदारांबरोबरच तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजपाने केला होता.
 
सावंत यांनी कार्यालयात पदभार ग्रहण केल्यानंतर सर्वांना बुके किंवा शुभेच्छा न देण्याची अपील केली. त्यांनी म्हटले की मी आपल्या मार्गदर्शक आणि आदर्श मनोहर भाई (पर्रिकर) यांच्याप्रती अत्यंत विनम्रता आणि कृतज्ञता दर्शवत पद ग्रहण केले आहे. राज्यात सध्या शोक असल्यामुळे मला बुके, ग्रीटिंग्स किंवा शुभेच्छा स्वीकार नाही.