शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गोवा , रविवार, 17 मार्च 2019 (21:09 IST)

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच 63 वर्षाच्या वयात निधन

गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे आज वयाच्या 63 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून मनोहर पर्रीकर हे स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त होते.
 
मनोहर पर्रीकर यांच्या निधनाची बातमी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्यांनी, “ज्येष्ठ नेते मनोहर पर्रीकर यांच्या निधनाची बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले. मनोहर पर्रीकर यांचे त्यांनी केलेल्या देश सेवेबाबत स्मरण केले जाईल.”असा संदेश दिला आहे.
 
पर्रिकरांना स्वादुपींडाचा कर्करोग झाला होता. वर्षभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मुंबईतल्या लिलावती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर सुरूवातीला उपचार झाले. नंतर अमेरिकेत न्यूयॉर्कमध्येही त्यांच्यावर काही महिने उपचार झाले. नंतर पर्रिकरांना अमेरिकेतून सुट्टी देण्यात आली होती.
 
पर्रीकर यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही निवडणूक प्रचारासाठी सुरू असलेल्या सभेत भाषण थांबवून पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहिली.