रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पुलवामा हल्ल्यात यूपीचे 12 जवान शहीद, योगींची 25 लाख आणि नोकरी देण्याची घोषणा

उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या प्रत्येक कुटुंबाला 25-25 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची घोषणा केली आहे. या व्यतिरिक्त जवानांच्या पैतृक गावाच्या संपर्कात येणारा मार्गाला त्यांचे नाव देण्याचेही सांगितले.
 
जम्मू-काश्मिराच्या पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांमधून 12 जवान उत्तर प्रदेशाचे होते. योगी सरकारने निर्णय घेतला आहे की शहीद जवानांचा अंतिम संस्कार पूर्ण राजकीय सन्मानपूर्वक करण्यात येईल, ज्यात प्रदेशातील मंत्री, डीएम आणि एसपी राज्य सरकाराच्या प्रतिनिधी रूपात सामील होतील.
 
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद अधिक प्रमाणात उत्तर प्रदेशातून होते. यात चंदौलीचे शहीद अवधेश कुमार, इलाहाबादहून शहीद महेश कुमार, शामलीहून शहीद प्रदीप, वाराणसीहून शहीद रमेश यादव, अग्राहून शहीद कौशल कुमार यादव, उन्नावचे शहीद अजीत कुमार, कानपुर देहातहून शहीद श्याम बाबू आणि कन्नौजहून शहीद प्रदीप सिंह सामील आहेत.