शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 19 मार्च 2019 (09:08 IST)

राहुल गांधी यांनी मौन राखून पर्रिकरांना वाहिली श्रद्धांजली

लोकसभा निवडणुकीत मिशन साऊथ मार्गी लावण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दक्षिण भारतील राज्यांमध्ये दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी हैदराबाद-कर्नाटक क्षेत्रातील कलबुर्गीमध्ये निवडणूकीची प्रचार सभा घेतली. जनतेला संबोधित करण्याआधी राहुल गांधी यांनी दोन मिनिटाचे मौन राखून पर्रिकरांच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी प्रार्थना केली. देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं रविवारी (१७ मार्च) निधन झालं. कर्करोगाच्या प्रदीर्घ आजारानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि जनतेचा नेता गेला, अशीच प्रतिक्रिया सर्वसामान्यांनी दिली. वयाच्या ६३ व्या वर्षी पर्रिकर यांनी अखेरचा श्वास घेतला. पर्रिकर यांच्या निधनानंतर साऱ्या देशातून दु:ख व्यक्त करण्यात येत असून, सोमवार (१८ मार्च) हा दिवस राष्ट्रीय दुखवटा म्हणून जाहीर करण्यात आला आहे.