रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: हैदराबाद , सोमवार, 11 मार्च 2019 (15:22 IST)

मोदी हे दहशतवाद्यासारखे दिसतात : विजयाशांती

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक हुकूशहासारखे काम करीत असून त्यांच्या कार्यकाळात लोकशाहीची हत्या करण्यात आली आहे. मोदी हे दहशतवाद्यासारखे दिसतात, असे वादग्रस्त विधान काँग्रेसच्या नेत्या विजयाशांती यांनी केले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी हे विधान केले.
 
काँग्रेसच्या माजी खासदार राहिलेल्या विजयाशांती म्हणाल्या की, राहुल गांधी हे लोकशाही व्यवस्थेसाठी लढाई लढत आहेत तर मोदी हे एका हुकूशहासारखे काम करीत आहेत. मोदींच्या कार्यकाळात लोकशाहीची हत्या करण्यात आली. लोकांना अडचणीत ढकलण्याचे काम मोदींनी केले आहे.  
 
पुढील पाच वर्षात ते हेच का करण्यासाठी निवडून येण्यासाठी प्रयत्नशील आहेत, परंतु, लोक त्यांना ती संधी देणार नाहीत, असे विजयाशांती म्हणाल्या. आगाी लोकसभा निवडणुकीत राहुल आणि मोदी यांच्यातच खरी टक्कर होणार आहे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
 
देशात भाजपची सत्ता आल्यापासून प्रत्येक जण भीतीखाली जगत आहेत. दहशतवाद्यांना जसे लोक घाबरतात तशी भीती लोकांना मोदींची वाटत आहे. मोदी कधी कोणता बॉम्ब फोडतील, याचा नेम नाही. लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचे काम मोदी करीत आहेत.
 
पंतप्रधानांचे हे लक्ष्य असायला नाही पाहिजे. नोटाबंदी, जीएसटी, बँकेतील काळा पैसा, पुलवामा दहशतवादी हल्ला या सर्व मुद्दावरून लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केल्याचा आरोप विजयाशांती यांनी केला आहे.