गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 11 मे 2017 (11:44 IST)

यंदा लवकरच मान्सूनचे अंदमानात आगमन, पुणे वेधशाळेची माहिती

यंदा लवकरच मान्सूनचं अंदमानात आगमन होणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेने  दिली आहे. नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून अंदमानात दाखल होण्यासाठी पोषक स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे 15 मेच्या आसपास मान्सून दक्षिण अंदमानात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. मान्सून दक्षिण अंदमानात दाखल व्हायचा सर्वसाधारण काळ 15 मे दरम्यान असतो. गेले चार पाच दिवस परिस्थिती दक्षिण अंदमानात मान्सून पोहोचायला पोषक आहे. त्यामुळे अंदमानात मान्सून वेळेत दाखल झाला तर पुढे केरळात आणि त्यानंतर महाराष्ट्रातही मान्सून वेळेत दाखल होईल.