मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 7 नोव्हेंबर 2021 (11:38 IST)

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर जिन्नांचा उल्लेख, योगींचा अखिलेश यांना टोला

Mentioning Jinnah on the eve of Uttar Pradesh elections
उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी मोहम्मद अली जिन्ना यांचा पुन्हा एकदा उल्लेख झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांच्यावर जिन्ना आणि सरदार पटेल यांची तुलना केल्याच्या मुद्द्यावरून नाव न घेता टीका केली आहे.

सरदार पटेल आणि जिन्ना यांचं नाव एकत्र घेतलं जाऊ शकत नाही, किंवा त्यांची तुलना करता येणार नाही. त्याचं कारण म्हणजे एकानं देश जोडण्याचं काम केलं आहे, तर दुसऱ्यानं तोडण्याचं, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
 
"देश जोडणाऱ्या सरदार पटेलांची तुलना देश तोडणाऱ्याशी जिन्नांशी करत आहेत. जनतेनं अशी लज्जास्पद वक्तव्य पूर्णपणे फेटाळून लावावीत," असं योगी म्हणाले.
 
योगींच्या या वक्तव्यावर अखिलेश यांनीही त्यांना पुस्तकं वाचण्याचा सल्ला दिला, तर त्याला पुन्हा प्रत्युत्तर देताना योगी यांनी प्राथमिक शिक्षण चांगलं नसल्यानं लोकांना नायक आणि देशद्रोही यांच्यातील फरक कळत नाही, असं म्हटलं.