शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 6 डिसेंबर 2023 (19:55 IST)

मेट्रो बनली कुस्तीचा आखाडा, धावत्या मेट्रोत दोघांमध्ये जोरदार हाणामारी

social media
सध्या सोशल मीडियावर मेट्रोत भांडण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. सीटवरून मेट्रोत झालेल्या भांडणाचे अनेक व्हिडीओ आपण बघितले असणार. लोक बस मध्ये ट्रेन मध्ये लोकल मध्ये मेट्रो मध्ये आपल्या बसण्याच्या जागेवर बॅग किंवा रुमाल किंवा इतर सामान ठेवतात.हे पाहून इतर प्रवाशी वाद घालतात. सध्या  दिल्ली मेट्रोचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन प्रवासी फक्त सीटवरून भांडत आहेत. दोघांमध्ये एवढी बाचाबाची झाली की मेट्रोच्या डब्यातील लोकांना स्वतःला वाचवण्यासाठी मध्यस्थी करावी लागली. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
 
या व्हिडिओमध्ये दोन जण  एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. दोघेही एकमेकांना धक्काबुक्की करत आहेत. तेथे उपस्थित लोक दोघांनाही रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही लोक या भांडणांचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत.
 
आतापर्यंत 15 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे आणि त्यासोबत प्रतिक्रियाही दिल्या आहेत. अशा लोकांचा मेट्रोमध्ये प्रवेश बंद करण्यात यावा, असे कमेंट करणाऱ्या युजरने लिहिले. दुसऱ्या युजरने लिहिले की, हे स्वस्त WWE आहे. 
 
Edited by - Priya Dixit