शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (13:21 IST)

पहिल्या वाढदिवसाला बाराव्या मजल्यावरून पडलं बाळ

ग्रेटर नोएडामध्ये वाढदिवसाच्या दिवशी एक निष्पाप चिमुकला अपघाताचा बळी ठरला. ही घटना सोमवारी कासा ग्रीन सोसायटी, ग्रेटर नोएडा पश्चिम येथे घडली. या निरागसाचे घर 12 व्या मजल्यावर आहे. तो घराबाहेर खेळत होता. खेळत असताना तो एका फ्लॅटवरून दुसऱ्या फ्लॅटमध्ये जात होता. मध्येच पायऱ्या होत्या. अचानक त्याचा पाय घसरला आणि तो गॅपमधून थेट तळघरात पडला. यामुळे त्याचा वेदनादायक मृत्यू झाला. सोमवारी या मुलाचा पहिला वाढदिवस होता. या अपघातामुळे त्याचे कुटुंब हादरून गेले आहे.
 
सोमवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. प्रॉपर्टी डीलर सतेंद्र यांचे कुटुंब कासा ग्रीन सोसायटीच्या 12 व्या मजल्यावर राहते. त्यांचा मुलगा रिवानचा सोमवारी पहिला वाढदिवस होता. पाहुणे आणि कुटुंबीय केक कापण्याच्या तयारीत होते, तेव्हा अपघात झाला.
 
असे मानले जात आहे की दरवाजा उघडा असल्यामुळे रिवान खेळत असताना घराबाहेर पडला. त्याने डोकावण्या प्रयत्न केला असताना त्याचा झोक गेल्याचा अंदाज पोलिस लावत आहे. अपघातानंतरही कोणीचाही मुलावर नजर पडली नाही.
 
खाली उपस्थित गार्डने जेव्हा मुलाला रक्ताने माखलेले पाहिले तेव्हा त्याचे हात पाय थरथर कापत होते. त्यांनी तातडीने सतेंद्रच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
 
अपघाताच्या वेळी रिवानचे मामा आजोबा- आजी आणि जवळचे नातेवाईकही घरात उपस्थित होते. आनंदाच्या भरात अचानक या अपघातामुळे घरात दु: खाचा डोंगर कोसळला. कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे.
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबीयांनी या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. मुलाचा मृतदेह घेऊन हे कुटुंब गाझियाबादमधील त्यांच्या वडिलोपार्जित घरी गेले. मात्र, पोलिसांनी लोकांचे जबाब नोंदवले आहेत.