वाढदिवसाच्या पार्टीला न नेल्याने नाराज झालेल्या अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीने वाढदिवसाच्या पार्टीला न नेल्यामुळे आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार भदोही जिल्ह्यातील एका १७ वर्षीय मुलीने तिच्या कुटुंबाने वाढदिवसाच्या समारंभाला न नेल्यामुळे नाराज होऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, किशोरी घरात लटकलेल्या अवस्थेत आढळली. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार,तिच्या आजोबांनी पोलिसांना कळवले आणि पोलिसांनी मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला.
Edited By- Dhanashri Naik