गुरूवार, 13 मार्च 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2025 (11:40 IST)

बाबांनी आईला लटकावले, 4 वर्षांच्या मुलीने आजीला केला व्हिडिओ कॉल; महिला शिक्षिकेच्या हत्येचे गूढ उलगडले

Moradabad : 35  वर्षीय महिला शिक्षिका तिच्या बेडरूममध्ये फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळली. ही माहिती मृत महिलेच्या आईला मृत महिलेच्या चार वर्षाच्या मुलीने दिली. या चार वर्षाच्या चिमुरडीने व्हिडिओ कॉलद्वारे आजी सांगितले की, बाबांनी आईला लटकावले. ती बोलत नाही नाहीये.  
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला त्याच्या पत्नीची हत्या करून ती आत्महत्येसारखी वाटवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सॉफ्टवेअर इंजिनिअर  त्यांची पत्नी आणि ४ वर्षांची मुलगी हे मुरादाबादमधील बुद्धि विहार येथे राहत होते. त्यांनी सांगितले की,  
बुधवारी रात्री 35 वर्षीय महिला शिक्षिका तिच्या बेडरूममध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळली. ही माहिती मृत महिलेच्या मुलीने आज्जीला सांगितली. ही बातमी मिळताच मृत महिलेचे पालक मुरादाबादला पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. तसेच माझोला पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांनी सांगितले की, आरोपी पतीला  अटक करण्यात आली आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे

Edited By- Dhanashri Naik