1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 10 ऑगस्ट 2017 (09:17 IST)

जागतिक दर्जाचे श्‍वानपथक मोदींची सुरक्षा करणार

देशाच्या पंतप्रधानांना कोणत्या प्रकारची सुरक्षा पुरवली जाते हे आपल्याला नव्याने सांगायला नको. देशातील सर्वोच्च यंत्रणा देशाचे प्रमुख पद सांभाळणाऱ्या या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी कार्यरत असते. ही सुरक्षा आणखी सक्षम करण्यासाठी यामध्ये अनेकदा नवनवीन बदल करण्यात येतात.
 
त्याचबरोबर पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेत असणारे श्वानही तितकेच तरबेज असावेत यासाठी या मागविण्यात आलेल्या श्वानांमध्ये जवळपास 30 हल्ले करणारे श्वान, बॉंबशोधक पथकातील श्वान आणि पाठलाग करणारे काही श्वान यांचा समावेश आहे. मागील वर्षभरात हे श्वान इस्त्रायलची राजधानी जेरुसलेम येथून मागविण्यात आले आहेत. आपल्या कामात जगात सर्वोत्तम हे श्वान असल्याचे म्हटले जाते.
 
1984 मध्ये या सुरक्षा दलाची स्थापना देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर करण्यात आली होती. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायलला भेट दिली होती. मोदी आणि इस्त्रायचे पंतप्रधान नेतान्याहू यांची यावेळी झालेली भेट दोन्ही देशातील संबंध सुधारणारी ठरली.
 
सोनिया आणि राहुल गांधींनाही विशेष सुरक्षा…
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाही पंतप्रधानांना दिल्या जाणाऱ्या विशेष सुरक्षा दलाकडूनच सुरक्षा पुरविण्यात येते. लॅबरेडॉर, जर्मन शिफर्ड, बेल्जियन मालिनिओन आणि आणखी एका रेअर ब्रीडचा या यंत्रणेत समावेश आहे. यासंदर्भातील वृत्त टेलिग्राफ वृत्तपत्राने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार या श्वानांचा या दलामध्ये समावेश पंतप्रधानांना सर्वोत्कृष्ट सुरक्षा यंत्रणा असावी यासाठी करण्यात आला आहे.