शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 23 जुलै 2022 (09:15 IST)

'हर घर तिरंगा' उपक्रमासाठी मोदींचं जनतेला आवाहन

modi
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम राबवण्यात येत आहे. याच अंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा उपक्रमाचे आयोजिन करण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांनी तीन दिवस आपल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.
 
यावेळी ट्विट करून नरेंद्र मोदी म्हणाले, "स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आपन 'हर घर तिरंगा' ही मोहीम राबवत आहोत. देशातील जनतेला मी आवाहन करतो की, येत्या 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून या मोहिमेला बळकटी द्यावी."
 
ज्यांनी भारताच्या ध्वजाचे स्वप्न पाहिले, त्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही या प्रसंगी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व महान स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करतो, असंही मोदी यावेळी म्हणाले.