सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: पुणे , मंगळवार, 14 जून 2022 (14:43 IST)

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व्यापत मान्सून गुजरातेत

monsoon
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडय़ाचा बहुतांश भाग व्यापत गुजरातेत सोमवारी प्रवेश केला. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असून, तो दोन दिवसांत विदर्भाचा काही भाग तसेच मध्य प्रदेशात प्रवेश करणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
 
मान्सूनची पश्चिम शाखा आता सक्रिय झाली असून, तिने गेल्या चार ते पाच दिवसांपासून पश्चिम किनारपटी्, गोवा, कर्नाटकाचा बहुतांश भाग, मराठवाडा-मध्य महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापत सोमवारी गुजरातेत प्रवेश केला. अरबी समुद्राचा बहुतांश भाग, तामिळनाडूचा बहुतांश भाग, पश्चिम बंगाल तसेच बिहारचा बराचसा भाग मोसमी वाऱ्यांनी आपल्या कवेत घेतला आहे. दीव, नंदुरबार, जळगाव, परभणी, बिदर, तिरुपती, पाँडेचरी अशी मान्सूनची रेषा आहे.