सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 3 जून 2021 (15:25 IST)

Monsoon 2021: केरळच्या दक्षिणेकडील भागात मान्सूनने जोरदार सुरुवात केली असून यावर्षी 101% पाऊस पडेल

केरळमध्ये मान्सूनने आज आगमन झाले. हवामान खात्याच्या ताज्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत नैऋत्य मॉन्सून दक्षिण व मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागात पोहोचेल. याशिवाय मान्सून दक्षिण तामिळनाडू आणि पुडुचेरीच्या काही भागांसह दक्षिण आतील कर्नाटकातही पोहोचेल. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार रायलसीमा आणि दक्षिण मध्य बंगालच्या उपसागरातील काही भागात मान्सूनची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
 
भारतीय हवामान विभागाने तीन जून रोजी मान्सून (Monsoon 2021) केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. हा अंदाज मान्सूनने खरा ठरत केरळमध्ये प्रवेश केला आहे. मान्सून केरळमध्ये दाखल होताच देशभरात पावसळ्याचा हंगाम सुरु झाला आहे. पुढचे चार महिने भारतात पावसाळा असणार आहे. केरळमध्ये आज पावसाने सुरुवात केली. आयएमडीनने दर्शवलेल्या अंदाजानुसार (IMD Forecast) यंदा भारतात मान्सून सामान्य राहणार आहे.
 
दक्षिण पश्चिम मान्सूनने केरळच्या दक्षिण भागात उपस्थिती दर्शवली आहे. केरळमध्ये सर्साधारणपणे एक जूनला मान्सून हजेरी लावतो. कधी कधी यात एकदोन दिवस फरक पडतो. आज सकाळपासूनच केरळमध्ये मेघांनी दाटी केली होती. मेघांच्या या दाटीतच मान्सूनचे आगमन झाले. आयएमडीने या आधी म्हटले की, मान्सूनच्या भारतातील आगमन 31 मेला होईल. मात्र, आयएमडीने पुन्हा अपडेट देत 1 जून आणि त्यानंतर 3 जूनची तारीख दिली. 
 
भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे की, यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या मान्सूनंध्ये पर्जन्यवृष्टी 92% ते 108% इतकी होऊ शकते. हाच मान्स दख्खनच्या पठारावर 93% ते 108% इतका कोसळू शकतो. याशिवाय उत्तर पूर्व भारतातही मान्सून दमदार हजेरी लावण्याची शक्यता आहे. उत्तर पूर्व भारतात 95% तर मध्य भारतात 106% इतका पाऊस डपण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, जुलै महिन्या पर्जन्यमान कसे राहील याबाबत आयएमडी जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा अंदाज वर्तवणार आहे.