शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 11 ऑक्टोबर 2018 (16:15 IST)

भाजपला धोक्याची घंटा ४५ पेक्षा अधिक आमदार पराभूत होणार

More than 45 MLAs
देशातील सर्वात मोठा पक्ष आणि एकहाती सत्ता असलेल्या भाजपला निवडणुकीत मोठा धक्का बसणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धक्का बसेल, असा अहवाल समोर आला आहे. या नुसार भाजपाच्या ४० टक्के म्हणजे ४५ आमदारांची चार वर्षातील कामगिरी खराब असून त्यांचे पुन्हा निवडून येणे कठीण आहे. असे सर्वेक्षणात अहवालात स्पष्ट म्हटले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारकडून जनमताची चाचपणी सुरु झाली आहे. भाजप सरकारने दिल्लीतील 'चाणक्य' या संस्थेकडून गुप्तपणे सर्वेक्षण केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २०१९ मध्ये होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश भाजपने ही बैठक घेतली आहे.  बैठकीवेळी सर्वेक्षणाचा अहवाल भाजपाच्या आमदार, खासदाराच्या बैठकीत प्रत्येकाला बंद लिफाफ्यात दिला आहे. हा लिफाफा घरी जाऊन उघडण्याचे आदेशही यावेळी आमदारांना दिला आहे. चाणक्यने केलेल्या सर्वेक्षणात ४५ आमदार आणि ६ खासदारांचे पुढच्या निवडणुकीतलं भवितव्य धोक्यात असल्याची माहिती पुढे आली आहे.