मुलायम यांनी मुलाला आणि भावाला पार्टी बाहेर काढले
उत्तर प्रदेशात सध्या यादव घरात मोठा गृह कलह निर्माण झाला आहे.मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना समाजवादी पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी अखिलेश यांना निलंबित करण्याची घोषणा केली आहे.
अखिलेश यांच्यासोबत त्यांचे काका आणि कट्टर समर्थक रामगोपाल यादव यांनाही सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आल आहे.याआधी गुरुवारी अखिलेश यादव यांनी स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले . उमेदवारांच्या यादीत त्यांच्या समर्थक उमेदवारांना डावललं गेल्यामुळे अखिलेश यादव नाराज आहेत. अखिलेश यादव यांनी आपल्या २३५ उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे. यावर पक्ष आणि शिस्त भंग या आधारे मुलायम यांनी आपला व्हेटो वापरत हे निलंबन केले आहे.