गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

योगींच्या मठाचा खजिनदार मुस्लीम

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची ओळख कठोर असे  हिंदुत्ववादी  आहे. तर दुसरीकडे त्यांनी अनेकदा मुस्लीम विरोधात त्यांच्या राजकीय जीवनात त्यांनी  अनेकदा प्रक्षोभक विधाने केली. तर उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत भाजपनं एकाही मुस्लिम व्यक्तीला पक्षाची उमेदवारी दिली नाही. योगी आदित्य नाथ यांच्या मुस्लिम विरोधी वक्तव्यामुळे अनेक वादही निर्माण झाले आहेत . त्यामुळेच ते कट्टर मुस्लिम विरोधक असल्याचं वेळोवेळी दिसून आलं आहे. असं असलं तरी त्यांच्या मठाच्या आर्थिक नाड्या या एका मुस्लिम व्यक्तीच्या हातात आहेत. त्याचं नाव आहे यासिन अन्सारी….. योगी आदित्यनाथ यांच्या मठातल्या यासिन अन्सारी यांनी छोटे महाराज असंही म्हटलं जातं. ते योगी यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात. त्यामुळे एका बाजूला जरी राजकीय कट्टर विरोध जरी असला तरी त्यांच्या सहकारी मुस्लीम असल्याने अनेकांना धक्का बसला आहे. तर अनेकांच्या मते राजकीय भूमिका ही व्यक्तिगत भुमिकेपेक्षा वेगळी असू शकते त्यामुळे असे असावे.