बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017 (09:18 IST)

विकासाच्या मुद्दावर लढा, मोदींची काँग्रेसवर तोफ

निवडणूकांपूर्वी काँग्रेस पक्षाचे लोक पक्ष सोडून भाजपात दाखल झाले यावर त्यांनी आपले आत्मपरिक्षण करावे. ज्यांच्या अध्यक्षांवरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत असे भष्टाचारी काँग्रेसचे लोक गुजरातचे काय भले करणार, उलट ते गुजरातमधल्या आमच्याच विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. जनतेला अशा प्रकारे भ्रमित न करता त्यांनी विकासाच्या मुद्दावर निवडणूक लढवून दाखवावी’ असे आव्हान देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर  तोफ डागली. गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान ते बोलत होते. 
 
काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले, ‘ते वंशवादाचे राजकारण करीत आहेत तर आम्ही आमच्या पुर्वजांनी दाखवलेल्या मार्गावर चालत आहोत. काँग्रेस पक्षाने देशाला अनेक मुख्यमंत्री, नेते दिले, मात्र आता त्यांनी आपले लक्ष्य केवळ खोटे बोलण्यावर केंद्रीत केले आहे. ते केवळ निराशावादी वातावरण निर्माण करण्याचे काम करीत आहेत’ असे त्यांनी सांगितले.