शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

देशात १०० हून अधिक पूल कोसळण्याच्या अवस्थेत

देशातील विविध भागांमधील १०० हून अधिक पूल कोसळण्याच्या स्थितीत असून त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी संसदेत दिली.

लोकसभेत गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी देशातील पुलांच्या सद्यस्थितीविषयी माहिती दिली. केंद्र सरकारने गेल्या वर्षभरात देशभरातील १ लाख ६० हजार पुलांचे सेफ्टी ऑडीट केले. यामध्ये १०० हून अधिक पूल कोसळण्याच्या अवस्थेत असल्याचे समोर आले असे गडकरींनी सांगितले.

धोकादायक अवस्थेतील हे १०० पूल कधीही कोसळतील अशा अवस्थेत असून त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे असे त्यांनी नमूद केले.