सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024 (16:43 IST)

शहीद जवानाच्या पत्नीवर पुतण्याने केला बलात्कार, अश्लील व्हिडीओ बनवला, पैसे उकळले

rape
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ मध्ये शहीद जवानाच्या पत्नीवर पुतण्याने बलात्कार करून  तिचा अश्लील व्हिडीओ नांवरून तिच्या कडून पैसे उकलण्याची घटना घडली आहे. पीडित महिलेने पोलिसांत तक्रार नोंदवली असून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीवर कडक कारवाई करण्याचे पोलिसांनी सांगितले. 

मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेचा पती 2017 मध्ये शहीद झाला.पतीच्या मृत्यू नंतर पीडित महिलेची आणि तिच्या कुटुंबाची काळजी घेण्याच्या बहाण्याने तिचा पुतणा घरी येऊ लागला आणि नंतर त्याने तिच्यावर बलात्कार करून त्याचा व्हिडीओ बनवला आणि तिला ब्लॅकमेल करून तिच्या कडून पैसे घेऊ लागला त्याने तिच्या कडून 39 लाख रुपये  घेतले आणि तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करू लागला. तिने त्याच्यापासून दूर जाण्याच्या प्रयत्न केला असता त्याने स्वतःच्या हातावर गोळी झाडली. 

पीडित महिलेने कंटाळून आरोपीच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीवर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आरोपीवर कारवाई सुरु असल्याचे पोलीस म्हणाले. 
 
Edited By - Priya Dixit