1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 (10:08 IST)

भीषण अपघात! बस उलटल्याने एकाचा मृत्यू, 12 जण जखमी

Uttar Pradesh News
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या गोसाईगंज भागात शुक्रवारी रात्री एक खाजगी बस पलटी झाल्याने एकाचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बस बहराइचहून नवी दिल्लीला जात होती आणि किसान पथ जवळ, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि रात्री 9 च्या सुमारास बस दुभाजकावर आदळली.
 
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एका महिलेचा या अपघातात मृत्यू झालेला आहे. तर इतर बारा जण जखमी झाले आहे व त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलीस कर्मचारी, अग्निशमन सेवा आणि स्थानिक रहिवाशांनी एकत्रितपणे बसमधून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न केले. अपघात कसा झाला याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Edited By- Dhanashri Naik