1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 8 मे 2025 (10:42 IST)

उत्तरकाशी मध्ये हेलिकॉप्टर कोसळले

उत्तरकाशीमध्ये अपघात झालेले हेलिकॉप्टर डेहराडूनहून हर्षिलला जात होते. याच दरम्यान वाटेत हा अपघात झाला. 
मिळालेल्या माहितीनुसार उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला असे सांगण्यात येत आहे. अपघातावेळी या हेलिकॉप्टरमध्ये ७ जण होते असे सांगण्यात येत आहे. हे हेलिकॉप्टर डेहराडूनहून हर्सिलला निघाले होते. या अपघातामागील कारण सध्या तपासले जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच उत्तरकाशी जिल्ह्याचे डीएम घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. या घटनेत जखमी झालेल्या दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचीही ओळख पटवली जात आहे.