शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 18 फेब्रुवारी 2023 (13:29 IST)

निक्कीने साहिलशी लग्न केले होते, कुटुंबीयांनी रचला हत्येचा कट

नवी दिल्ली- निक्की हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. पोलिसांनी दावा केला की निक्की यादवने ऑक्टोबर 2020 मध्ये साहिल गेहलोतशी आर्य समाज मंदिरात लग्न केले होते. साहिलचे कुटुंब या लग्नावर खूश नव्हते आणि त्यांनी निकीच्या हत्येचा कट रचला.
 
यानंतर साहिलचे लग्न दुसऱ्या मुलीसोबत निश्चित झाले. निक्की यादवच्या हत्येचा कट रचण्यात आला होता ज्यामध्ये साहिलच्या कुटुंबाचाही सहभाग होता. साहिलने 10 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील निगमबोध घाट स्मशानभूमीच्या पार्किंगमध्ये त्याची गर्लफ्रेंड निक्की यादवची हत्या केली होती. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केले. दुसऱ्या दिवशी परत आल्यावर निक्कीचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला होता.
 
या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी साहिलचे वडील वीरेंद्र सिंग तसेच त्याचे दोन चुलत भाऊ, आशिष कुमार-नवीन, दोन मित्र, लोकेश सिंग आणि अमर सिंह यांना या संपूर्ण कटात सहभाग असल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. पोलिसांनी यापूर्वीच साहिलला अटक केली आहे.