1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (10:55 IST)

टेम्पो ट्रॅव्हलर आणि दुधाची गाडी यांच्यात जोरदार धडक, अपघातात नऊ जण ठार

कर्नाटकातील हसन येथे देव दर्शनातून परत येताना टेम्पो ट्रॅव्हलर आणि दुधाच्या गाडीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधीनगरजवळील अर्सिकेरे तालुक्यात ही घटना घडली. टेम्पो ट्रॅव्हलर आणि केएमएफच्या दुधाच्या गाडीचा वेग वेगवान असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 
 
 
टेम्पो ट्रॅव्हलरमधील लोक धर्मस्थळ, सुब्रमण्यम आणि हसनंबा या देवस्थानांना भेट देऊन घरी परतत होते, असे तपासात समोर आले आहे. वाटेत काळाने झडप घालून हा अपघात झाला. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती पीडित कुटुंबीयांना दिली आहे. 
 
Edited By - Priya Dixit