1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 27 मे 2020 (12:48 IST)

शाळा कॉलेज कधी सुरू होणार? केंद्रीय गृहमंत्रालयाने केलं स्पष्ट

school and collage
देशभरात कोरोना व्हायरसचं थैमान सुरू असून देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. देशभरात लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपायला आला असून शाळा- कॉलेज कधी सुरू होणार याबद्दल दररोज नवीन माहीती आणि प्रश्न उद्भवत आहे. 
 
काही दिवसांपासून 15 जूनपासून शाळा- कॉलेज सुरू होणार अशी चर्चा सुरू असताना शाळा- महाविद्यालयं सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही आदेश देण्यात आला नाही असं केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
 
केंद्रीय गृहमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार शाळा आणि महाविद्यालयं सुरू करण्यासाठी अजूनही परवानगी देण्यात आली नाही. तसे कोणतेही निर्देश राज्यांना देण्यात आले नाहीत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.
 
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जवळपास 17 मार्च पासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. अनेक शाळा आणि कॉलेज यांचे क्वारंटाइन सेंटरमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे.