1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: जम्मू , बुधवार, 30 जानेवारी 2019 (15:13 IST)

मोदी आणि शहा म्हणजे ओडोमॉस : ओमर अब्दुल्ला

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसबद्दल बोलताना काँग्रेसला 'ओआरओपी' असे संबोधले होते. त्यावर उत्तर देताना नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना ओडीओएमओएस (ओव्हरडोस ऑफ ओन्ली मोदी ओन्ली शहा : ओडोमॉस) असे संबोधले आहे. देशाला या ओडोमॉसमुळे खूप त्रास सहन करावा लागत असल्याचे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
 
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दोन दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशमध्ये एका निवडणूक सभेला संबोधित करताना काँग्रेसवर हल्ला चढवला. काँग्रेसने नुकतेच पक्षाच्या सरचिटणीसपदी माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका गांधी यांची नियुक्ती केली. त्यावर भाजपने टीका सुरु केली आहे. त्यावरुन टीका करताना शहा म्हणाले, काँग्रेस हा पक्ष म्हणजे ओआरओपी (ओन्ली राहुल ओन्ली प्रियांका) आहे. त्याला आज अब्दुल्ला यांनी प्रत्युत्तर दिले.
 
शहा म्हणाले होते की, मोदी सरकारने 'वन रँक वन पेन्शन'च्या (ओआरओपी) माध्यमांतून माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे भविष्य सुरक्षित केले.