शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (19:56 IST)

नक्षलवाद्यांच्या IED स्फोटात एक जवान जखमी

छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात शुक्रवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात सशस्त्र सीमा बल (एसएसबी) जवान जखमी झाल्याची वार्ता मिळाली आहे. ही घटना दुपारी 12.30 ते 1च्या दरम्यान रावघाट पोलीस स्टेशन हद्दीतील पाटकलबेडा गावाजवळ घडली, जेव्हा एसएसबीच्या 33 व्या बटालियनचे एक पथक रेल्वे मार्ग सुरक्षा कर्तव्यासाठी निघाले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले.
ते म्हणाले की, राजधानी रायपूरपासून 150 किमी अंतरावर असलेल्या कोसरोंडा गावात असलेल्या त्यांच्या छावणीजवळील गस्ती दल जंगलाला वेढा घालत असताना माओवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला, त्यात एक जवान जखमी झाला. जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 2016 पासून SSB च्या 33व्या आणि 28व्या दोन बटालियन्स जिल्ह्याच्या तडोकी आणि रावघाट भागात बांधकामाधीन  दल्लीराजहरा (बालोद जिल्हा) रावघाट (कांकेर) रेल्वे प्रकल्पाच्या रक्षणासाठी तैनात केल्या आहेत.