रविवार, 3 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (18:44 IST)

महिलेच्या गळ्यात अडकले कोरोना टेस्ट किट

कोरोना चाचणीसाठी स्वॅब देणाऱ्या गर्भवती महिलेल्या गळ्यात कोरोना किट तुडून पडल्याची धक्कादायक घटना झारखंड येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये समोर आली आहे. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये एकच खळबळ माजली. या महिलेला बोकारो येथून धनबादमध्ये तातडीने पाठवण्यात आले. कोरोना चाचणीच्या दरम्यान गळ्यात किट अडकल्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे हॉस्पिटलमध्ये एकच गदारोळ माजला. सर्व आरोग्य कर्मचारी चिंतेत आले. याची माहिती बोकारोतील सिव्हिल सर्जन डॉ. अशोक कुमार पाठक यांना देण्यात आली. डॉ. पाठक यांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली. त्यांनी पीडित महिलेला त्वरीत धनबाद येथील पीएमसीएच येथे उपचारासाठी पाठवले.
 
या घटनेनंतर ती गर्भवती महिला आणि तिचे कुटुंबिय चिंतेत पडले. तेथील कर्मचाऱ्यांनी महिलेल्या गळ्यात अडकून पडलेले कोरोना किट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र हे किट काढण्यात ते अयशस्वी ठरले. फळ बाजारात राहणाऱ्या ४० वर्षीय उमादेवी यांच्यासोबत ही घटना घडली. सिव्हिल सर्जन डॉ. अशोक कुमार पाठक यांनी या घटनेबाबत सांगताना म्हटले आहे की, टेक्निशिअनने काळजीपूर्वक काम करणे अपेक्षित आहे. त्यांनी म्हटले की, ही काही अती गंभीर बाब नाही. हे किट काढण्यासाठी कोणत्याही शस्त्रक्रियेची गरज भासत नाही. त्या गर्भवती महिलेला उत्तम उपचारासाठी धनबाद येथील पाटलिपुत्र मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. तिथे तिच्यावर आधुनिक उपकरणांचा वापर करून उपचार केले जातील, असे डॉक्टरांनी सांगितले.