रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 7 डिसेंबर 2022 (23:18 IST)

वधूचा मेकअप खराब केल्यामुळे पार्लर चालकावर गुन्हा दाखल

मध्य प्रदेशातील जबलपूर शहरात एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका वधूचा मेकअप ब्युटीशियनने बिघडवला, त्यानंतर वधूच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात तक्रार केली. खराब मेकअप आणि असभ्य भाषेचा वापर केल्याची तक्रार करत नातेवाईकांनी पार्लरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वधूच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की ब्युटी पार्लर चालकाने वधूचा मेकअप खराब केला, तिला फोनवर धमकी दिली, तिच्याशी असभ्य भाषेत बोलले आणि जातीय टीका केली.
 
प्रकरण 3 डिसेंबरचे आहे. वधू राधिका सेनच्या मेकअपसाठी, तिच्या कुटुंबाने ब्युटी पार्लर संचालिका मोनिका पाठकशी तिचा मेकअप करून घेण्यासाठी बोलले होते. लग्नाच्या दिवशी नातेवाईकांनी पार्लर संचालिकाला फोन केला असता तिने फोन उचलला नाही. नंतर, पार्लर संचालिकाने काही कामानिमित्त बाहेरगावी जाण्याचे सांगितले आणि वधूच्या कुटुंबीयांना मेसेज करून तिच्या पार्लरमध्ये काम करणाऱ्या मुलीला मेकअप करण्यास सांगितले. वधूचा मेकअप करून घेण्यासाठी नातेवाईक पार्लरमध्ये पोहोचले असता तेथे काम करणाऱ्या नवशिक्या कर्मचाऱ्याने वधूचा मेकअप खराब केला. याबाबत वधूच्या कुटुंबीयांनी पार्लरच्या संचालिकेला तक्रार केली असता त्यांनी आपली चूक मान्य करण्याऐवजी वधूच्या कुटुंबीयांना धमक्या देण्यास सुरुवात केली. 
 
ब्युटी पार्लर संचालिके ने वधू आणि तिच्या कुटुंबियांसोबत केलेल्या असभ्य वर्तन आणि जातीवाचक वक्तव्याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
 
Edited by - Priya Dixit