शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मे 2017 (16:31 IST)

आता पंतजली सैनिक शाळा सुरु करणार

योगगुरु रामदेव बाबा शहिदांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळावं यासाठी पंतजली सैनिक शाळा सुरु करणार आहेत. यावर्षी ही शाळा सुरु करण्यात येणार असून दिल्ली - एनसीआरच्या आसपास ही शाळा असेल अशी माहिती रामदेव बाबा यांनी दिली आहे. सोबतच सुकमा नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्यात आल्याचंही रामदेव बाबा यांनी यावेळी सांगितलं. हरिद्वारमधील पतंजली योगपीठाच्या वार्षिक पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.