रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑक्टोबर 2016 (12:48 IST)

काश्मीरमध्ये कबुतरांमार्फत हेरगिरी ?

जम्मू-काश्मीरमध्ये गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) पोलिसांकडून पकडण्यात आलेल्या 153 कबूतरांबाबत  चौकशी करत आहे. या कबूतरांच्या माध्यमातून हेरगिरी केली जात होती आणि याचा वापर पाकिस्तानची हेरयंत्रणा करत होती असा संशय सीआयडीला आहे. ही कबूतरे पंजाब सीमेवरून तस्करीद्वारे काश्मीरच्या पुलवामा येथे आणली जात होती. काही दिवसांपूर्वी काश्मीरला जाणाऱया एका वाहनातून पोलिसांनी काही बॉक्स जप्त केले होते. यात 153 कबुतरे होती. ही कबुतरे काश्मीरला पाठविली जात होती. सर्व कबुतरांवर गुलाबी निशाण होता आणि त्यांच्या पायांना घुंगरूसदृश वस्तू बांधण्यात आली होती असे एका पोलीस अधिकाऱयाने सांगितले.